आजकाल अवांतर वाचन कमी झाल्याची खंत ऐकू येते. अशा वेळी काहीतरी दर्जेदार व वाचनीय साहित्य अंकाच्या स्वरुपात सादर करावं असं आम्हाला वाटलं आणि त्या उद्देशाने जगाच्या वेगवेगळ्या भागांतून आम्ही काही साहित्यप्रेमी एकत्र आलो. एक वार्षिक अंक काढायचं ठरवलं आणि पाहतापाहता ‘निनाद’चा पहिला वार्षिक अंक २०१९ च्या अखेरीस जन्माला आला. आम्हाला लेखक आणि वाचकांचा इतका छान आणि भरघोस प्रतिसाद मिळाला की नव्या हुरूपाने आम्ही आता दुसऱ्या अंकाच्या बांधणीला सुरूवात केली आहे.
तर आपल्याला विनंती आहे की आपण जर लेखक असाल, कवी असाल, कथाकार असाल किंवा व्यंगचित्रकार असाल, तर आपली सर्वोत्तम कलाकृती आमच्यापर्यंत पोहोचवा. एका उत्तम वाचकवर्गापर्यंत ती पोहोचवायची आम्ही तुम्हाला हमी देतो.
- साहित्य Word file मध्ये editors@3.141.121.59 या email वर पाठवावे. तसेच काही प्रश्न असल्यास त्याच email वर संपर्क साधावा.
- साहित्य मराठी किंवा English यापैकी कुठल्याही भाषेत चालेल.
- आपण पाठवलेलं साहित्य हे कुठल्याही छापील माध्यमामध्ये पूर्वप्रकाशित नसावे.
- शब्दसंख्या २५०० च्या आत असणे आवश्यक आहे.
- साहित्य पाठवायला वयोमर्यादा नाही.
- तसेच, तुम्ही कुठल्याही देशाचे रहिवासी असलात तरी आम्हाला तुमचं साहित्य हवं आहे.
- साहित्य पाठवायची शेवटची तारीख: १ ऑगस्ट, २०२०.
- साहित्याची निवड करण्याचा अंतिम निर्णय संपादक मंडळाकडे राहील.
आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो.
– टीम अंक ‘निनाद’

